वाशीम – वाशीमच्या कारंजा तालुक्यातील पोहा येथील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समजते.
रामेश्वर भगवान सुफलकर (47), असे आत्महत्याग्रस्त शेतकर्याचे नाव आहे़. ही घटना काल सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पोहा येथील शेतकरी रामेश्वर भगवान सुफलकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर काही बँकांचे कर्ज आहे़ सततच्या नापिकीमुळे बँकांचे कर्ज फेडणे व प्रपंच चालविणे कठीण होऊन बसले होते़ या वैफल्यातून त्यांनी गावातील गुणवंत शिंदे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.