पोस्को प्रकरणी 39 वर्षीय पित्याला अटक – eNavakal
गुन्हे मुंबई

पोस्को प्रकरणी 39 वर्षीय पित्याला अटक

मुंबई – विनयभंगप्रकरणी 39 वर्षीय पित्याला साकिनाका पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर त्याच्याच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशी सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सतरा वर्षाची ही मुलगी तिच्या पालकांसोबत साकिनाका
परिसरात राहते. गेल्या महिन्यात तिची आई तिच्या भावासोबत बाहेर गेली होती. त्यानंतर ती आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेली होती. यावेळी घरात असलेल्या तिच्या पित्याने दरवाज्यातील होलमधून तिला आंघोळ करताना पाहिले. सुरुवातीला तिने कोणी अज्ञात व्येी असावा असे वाटले होते,
मात्र ती बाहेर आल्यानंतर तिला तिचे वडिलच तिला आंघोळ करताना पाहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ती तिच्या आजीकडे निघून गेले. तिथे तिने आजीसह आईला ही माहिती दिली. या माहितीनंतर त्यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध तक्रार केली होती. या मुलीच्या तक्रारीनंतर
पोलिसांनी विनयभंग आणि बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत बुधवारी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More