पोलीस निरीक्षकाला पोलीस उपायुक्ताने कानशिलात लगावली – eNavakal
News मुंबई

पोलीस निरीक्षकाला पोलीस उपायुक्ताने कानशिलात लगावली

मुंबई – मालाड येथे बारवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकालाच पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी कानशिलात लगावल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या वृत्ताला गुन्हे शाखेचे अधिकारी दुजोरा देत असले तरी आयपीएस अधिकार्‍यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. अशी कोणतीही घटना घडलेला नाही. ते वृत्त निराधार असल्याचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी सांगितले.
दरम्यान हा प्रकार इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समक्ष घेतल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. केवळ पोलीस उपायुक्त असल्याने विक्रम देशमाने यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप संबंधित पोलीस करीत आहेत. संबंधित पोलीस निरीक्षक सध्या कांदिवली गुन्हे प्रकटीकरण विभाग युनिट अकरामध्ये कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी या पथकाने रात्री उशिरा मालाड येथील एस. व्ही रोडवरील अरुणा बारवर कारवाई केली होती. या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नव्हती, ती कारवाई गुन्हे शाखेची होती. त्याचा राग आल्याने रात्री उशिरा बारमध्ये आलेल्या पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी कुठलीही शहानिशा न करता या पोलीस निरीक्षकाला जोरात कानशिलात लगावली. या प्रकाराने तिथे उपस्थित पोलिसांना धक्काच बसला. मात्र नंतर त्यांनी तो पोलीस निरीक्षक बारचा मॅनेजर आहे असे वाटल्याने त्याला कानशिलात लगावल्याचे सांगून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बारचा मॅनेजर पंचनामा करीत नाही, पोलीसच कारवाईनंतर पंचनामा करतात हे माहित असतानाही एका पोलीस उपायुक्त इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोरच पोलीस निरीक्षकाला कानशिलात लगावल्याने पोलीस दलात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी अशीच कुठलीही घटना झाली नाही. ही अफवा असल्याचे सांगून पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. या वृत्ताचा सहपोलीस आयुक्तांनी इन्कार केला आहे. काहींजण वैयक्तिक फायद्यासाठी अशा वृत्ताचा आधार घेत आहेत. बार आणि खबर्‍यांचा नेटवर्क आहे. त्यातून काहीतरी वाद व्हावा या दृष्टीने ही बातमी पसरविण्यात आली आहे. अशा प्रकारे अफवा पसरविणार्‍याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरु असल्याचेही पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More
post-image
देश

कोरोनाग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली – दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात एका कोरोनाच्या संशयित रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या उंचावरून उडी...
Read More
post-image
देश

तेलंगणात नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

हैदराबाद – तेलंगणा राज्यातही कोरोनाचे संकट वाढले आहे. तिथे नवे 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी सुदैवाने गेल्या 24 तासांमध्ये एकाची मृत्यू झालेला नाही....
Read More
post-image
देश

डॉक्टरांवर हल्ला झालेल्या इंदुरमध्ये सापडले १० कोरोना रुग्ण

इंदूर – मध्य प्रदेशातील मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये कोरोनाचे नवे १० रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे एक पथक या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना संक्रमणापासून आदिवासी पट्टा सुरक्षित

जळगाव – राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या संक्रमण प्रक्रियेने थैमान घातले असताना जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी पट्टा मात्र सध्या तरी कोरोना संक्रमणापासून सुरक्षित...
Read More