पोलिसांची तळीरामांवर करडी नजर – eNavakal
गुन्हे मुंबई

पोलिसांची तळीरामांवर करडी नजर

नवी मुंबई-सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईची तरुणाई सायंकाळीच रस्त्यावर उतरली आहे.तरुणांच्या झुंडी शहरातील चौकाचौकामध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज झाली असताना पोलिसांनी देखील जय्यत तयारी केली आहे.शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलीस करडी नजर ठेवण्यासाठी आठ वाजताच हजर झाले आहेत.वाहनांची कसून तपासणी करण्याबरोबरच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सुमारे अडीच हजार पोलिसाचा ताफा यासाठी रवाना करण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पामबीच मार्ग,वाशी सागर विहार,बेलापूर समुद्र किनारा,नेरूळ ज्वेल ऑफ नवी मुंबई,या ठिकाणी गर्दी जमा होते.तसेच वाशी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पब, बार याठिकाणी जल्लोष साजरा केला जातो.या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांबरोबर गर्दीचे बार, मद्य विक्री केंद्राच्या अवती भोवती पोलीस तैनात केले आहेत.कोपरी,ठाणे बेलापूर रस्ता,ऐरोली मुलुंड रस्ता ,सायन पनवेल महामार्ग,कोपरखैरणे,नेरूळ,सानपाडा,वाशी,सी बी डी या ठिकाणच्या मुख्य चौकात वाहतूक पोलीस आणि पोलीस शस्त्र सह तैनात करण्यात आले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरसह जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो कोटी रुपये दिल्याची फुशारकी मारत असतानाच...
Read More