पोलादपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा – eNavakal
महाराष्ट्र

पोलादपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पोलादपूर बस अपघातामधील मृतांच्या प्रत्येक कुटूंबियांना 10 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी ही माहिती दिली आहे. बँकेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या 30 कर्मचारी अंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातामध्ये मृत्युमुखी पडले होते.

जिल्ह्यासाठी ही अतिशय धक्कादायक घटना आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दापोली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हि अतिशय दुर्दैवी घटना असून, जिल्हा बँकेने या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी दिली. तसेच मृतांमधील 8 जणांचे एटीएम कार्ड जिल्हा बँकेचे आहेत, त्यामुळे या 8 जणांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार असल्याची माहितीही यावेळी चोरगे यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More