पैज लावण्याचा खेळ जीवावर बेतला कृष्णा नदीत तरुण बेपत्ता – eNavakal
News अपघात महाराष्ट्र

पैज लावण्याचा खेळ जीवावर बेतला कृष्णा नदीत तरुण बेपत्ता

डिग्रज- मौजे डिग्रज बंधार्‍यावर पार्टीसाठी गेलेल्या तरुणांना पैज लावण्याचा खेळ चांगलाच महागात पडला. नदीत उड्या मारण्याच्या या खेळात तिघांपैकी एक तरुण कृष्णा नदीत बेपत्ता झाला. दोघांना वाचविण्यात यश आले. वैभव पांढरे (35) रा. कसबे डिग्रज, हा कृष्णा नदीत वाहून गेला. किशोर पांढरे (31) आणि राजू पांढरे (25) हे दोघेजण बचावले आत्तेत. हे तिघेही तरुण पार्टीसाठी डिग्रज बंधार्‍यावर गेले होते. त्यांनी मद्यपान केले होते.

जेवणानंतर बंधार्‍यावरून उडी मारण्याची तिघांमध्ये पैज लागली. एकाच वेळी तिघांनीही बंधार्‍यात उड्या मारल्या. बंधार्‍यात भरपूर पाणी व वेग होता. अंदाज न आल्याने वैभव पांढरे वाहून गेला. बाकीच्या दोघांनी भीतीने आरडाओरडा सुरू केला. नदीकाठावरील लोकांनी धाव घेत मदत करीत किशोर आणि राजू पांढरे यांना बाहेर काढले. वैभव मात्र पाण्यात दिसेनासा झाला. लोकांनी शोधाशोध केली. पण अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. वैभव पांढरे ग्रामपंचायत सदस्या प्रियंका पांढरे यांचे पती होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More