पेमेंट स्थानिक चलनात स्वीकारावे तेल कंपन्यांना पंतप्रधानांचे साकडे – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

पेमेंट स्थानिक चलनात स्वीकारावे तेल कंपन्यांना पंतप्रधानांचे साकडे

नवी दिल्ली  -पंतप्रधानांनी इंधनाच्या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी आज जगभरातील तेल कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल कंपन्यांना पेमेंटबाबतच्या अटींचे पुनर्वालोकन करण्याबाबत सांगितले. तसेच तात्पुरता दिलासा म्हणून पेमेंट हे स्थानिक चलनात स्वीकारावे, असे साकडे त्यांनी जगभरातील तेल कंपन्यांच्या अधिकार्‍यांना घातले.
या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनीही या सहभाग घेतला होता. तर तेल निर्यातदार देशांच्या संघटनेचे (ओपेक) सरचिटणीस मोहम्मद बारकिंदो, वर्ल्ड बँक, ओएनजीसी, आयओसी, एचपीसीएल, बीपीसीएल आदी कंपन्यांचे सीईओ व अध्यक्ष उपस्थित होते. उर्जेचा खर्च कमी होण्यासाठी तेल उत्पादक आणि तेल खरेदी करणारे देशांमध्ये भागीदारी असणे आवश्यक आहे. नैसर्गिक वायू निर्मितीत खासगी क्षेत्राचा सहभाग वाढण्याची गरज आणि तेल, उद्योग क्षेत्राच्या बाजारपेठेमध्ये भारताचे महत्त्वाचे स्थान असल्याचे पंतप्रधानांनी तेल कंपन्यांच्या निर्दशनास आणून दिले. बाजारपेठेतील तेलाची किंमत ही तेल उत्पादक देश निश्चित करतात. मुबलक उत्पादन होऊनही ते किंमती वाढवितात. उत्पादक आणि तेल खरेदी करणारे देश यांमध्ये भागीदारी असेल तर जागतिक अर्थव्यवस्था स्थिर होण्यास मदत होईल, असा विश्वास मोदींनी यालवेळी बोलताना व्यक्त केला.  तेल खरेदी करणार्‍या देशांना तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक आव्हांनाचा सामना करावा लागतो. तेल उत्पादक देशांनी त्यांचे अतिरिक्त उत्पादन होणारे तेल विकसनशील देशात वितरीत करावे, असेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More