पूर्णेत मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतले विष – eNavakal
News आघाडीच्या बातम्या

पूर्णेत मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतले विष

परभणी – तीन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची धग सुरू आहे. जागोजागी मोर्चे , आंदोलन, तोडफोड, जाळपोळ सुरू असतानाचं  २३ रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला तर बुधवारी रात्री सरकारच्या निष्क्रीयते विरोधात पुर्णा तालुक्यातील आलेगांव सवराते येथील एका अविवाहीत तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.  त्याला गावकऱ्यांनी तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून तो मृत्यूशी  अक्षरशा: झुंज देत आहे. तर संपूर्ण गावकरी महसूल, पोलिस प्रशासन नांदेड येथील दवाखान्यात तळ ठोकून आहेत.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करु लागला औरंगाबाद जिल्ह्यातील तरुण काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्यानंतर मराठवाड्यात आंदोलनाची तीव्रता वाढली. पुर्णा तालुक्यातील झिरो फाटा, चुडावा, कावलगांव, न-हापूर येथे रास्तारोको, तर पुर्णा व ताडकळस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनात तालुक्यातील आलेगांव सवराते येथील २४ वर्षिय तरुण प्रशांत विश्वनाथ सवराते हा आंदोलनात अग्रभागी होता. दोन ते तिनं दिवस आंदोलन करुनही सरकार आंदोलनाची दखल घेण्यास तयार नसल्याने त्याने व्यथित होऊन २५ जुलै रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गावालगत असलेल्या शेतात विषारी औषध प्राशन केले.आंदोलक  कार्यकर्ते व घरातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली असता त्याचा भावाला तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून गुरुवारी दिवसभर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.रुग्णालयात संपूर्ण गावांसह महसूल, पोलिस प्रशासनाचे अधिकारी तळ ठोकून आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More