नवी दिल्ली -सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. या प्रार्श्वभूमीवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी पक्ष प्रवेश घेतला. पूनम सिन्हा यांना लखनौ मतदारसंघाचे तिकीटही मिळाले आहे. त्यामुळे लखनौमध्ये भाजपचे राजनाथ सिंह आणि समाजवादी पक्षाकडून पूनम सिन्हा आशी लढत रंगणार आहे. 18 एप्रिल रोजी पूनम सिन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर भाजपचे राजनाथ सिंह यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लखनऊ येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १८ एप्रिल अंतिम तारीख आहे. तर ६ मे मतदानाची तारीख आहे.
Lucknow: Shatrughan Sinha’s wife Poonam Sinha joins Samajwadi Party in presence of Dimple Yadav. pic.twitter.com/sgFg3C5oRm
— ANI UP (@ANINewsUP) April 16, 2019