‘पुष्पक विमान’ – स्वप्नांचे आनंद तरंग” – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन लेख

‘पुष्पक विमान’ – स्वप्नांचे आनंद तरंग”

“स्वप्न बघणं हा मनुष्याचा स्वभाव आहे, स्वप्नामध्ये माणुस कोणत्याही कल्पना करू शकतो, जे आपणांस  अनुभवता आले नाही ते त्याला स्वप्नात दिसते”

“मनी असे ते स्वप्नी दिसे” असे म्हणतात ते काही खोटे नाही. स्वप्न बघायला वयाचे बंधन नाही, अनेक नवी कल्पनांची भरारी आपण स्वप्नात घेत असतो. आपल्याला अस वाटत कि माणुस म्हातारा झाला कि त्याची स्वपने संपतात- पण तसे नसते -आजी/आजोबा आपल्या नातवंडांचे लाड करण्यात .आणि त्यांच्यासाठी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात त्यांचे आयुष्य निघून जाते- पण आजी- आजोबांची सुद्धा काही स्वप्ने असतीलच ना, ह्याचा विचार त्यांचा नातू करतो- हया मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत कान्हा मॅजिक, श्री गणेश फिल्म्स आणि मार्केटिंग,  हया चित्रपट संस्थेतर्फे “पुष्पक विमान” हया चित्रपटाची निर्मिती केली असून,  ह्या चित्रपटाचे निर्माते मंजिरी सुबोध भावे, सुनील फडतरे, अरुण जोशी, मुकेश पाटील  आहेत. झी  स्टुडीओज ची हे प्रस्तुती असून  दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले आहे.  कथा- सुबोध भावे, पटकथा- चेतन सौंदाणे- वैभव चिंचाळकर यांची असुन संवाद चेतन सौंदाणे यांनी लिहिले आहेत, संगीत-नरेंद्र भिडे-संतोष मुळेकर यांचे लाभले आहे. छायाचित्रण महेश अणे यांनी केले असुन गीते समीर सामंत / चेतन सौंदाणे यांची आहेत. हया मध्ये मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी महाजन, सुयश झुंझारके, राहुल देशपांडे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत.

हि आजोबा आणि नातवाची कथा असून , सर्वसामान्य माणसाची कथा आहे, विष्णुदास वाणी ऊर्फ तात्या- हे आजोबा आणि विलास हा त्यांचा नातू असून  आजोबा जळगाव  मधील एका खेड्यात शेतीवाडी  असलेल्या घरात राहतं असतात. आजोबा गावात किर्तन करतात. ते खुप भावनिक आहेत,  आपली शेतीवाडी गावातील लोक लुबाडतील अशी शंका त्यांना सतत सतावीत असते.  त्यांचा नातू विलास हा मुंबईला त्याच्या बायकोसह राहत असतो. आजोबा सारखी विलासची आठवण काढत त्याची वाट बघत असतात.  तात्यांचे आवडते संत तुकाराम, त्यांच्या  “पुष्पक विमानाची” कथा किर्तनात ते रंगवून सांगतात,  तात्यांचा  नातवाबरोबर खेळण्यात  खूप चांगला वेळ जायचा- नातवाच्या खेळामधील भोवरा, आणि त्यांनी कागदाचे बनवलेलं विमान हे त्यानी जपुनं ठेवलेलं असते, आजोबांची सुद्धा पुष्पक विमानात बसण्याची ईच्छा असते, आणि एक दिवस विलास गावी येतो आणि तात्यांना मुंबईला घेऊन जातो.

वयोवृद्ध झालेल्या तात्यांनी आपल्या सोबत मुंबईला रहावे ही विलासंची इच्छा असते.  पण तात्यांना मुंबईत रहाणे पसंत नसते, विलासची बायको कोकणातली त्यामुळे ते तिच्याशी बोलताना सतत फणसावरून टोमणे मारत असतात, पण त्यांचे तितकेच प्रेम सुद्धा आपल्या नातसुनेवर असते,  टोमणे मारणे हा त्यांचा छंद असतो. जसंजसा माणूस म्हातारा व्हायला लागतो त्यावेळी आपला स्वाभीमान आणि देह परावलंबी व्हायला लागतात. तुमच्या मनांत जो पर्यंत आशावाद असतो तो पर्यंत तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता,  एक दिवस विलास बोलताना तात्यांना सांगतो कि आपली गावाकडची शेतजमीन घर विकूया आणि त्या पैशातून आपण मुंबईला राहूया. मी माझा गॅरेजचा व्यवसाय मोठा करतो.

तात्यांनी विलाससाठी खूप कष्ट करून त्याला मोठे केलेलं असतं. गावातली शेतजमीन, घर हे आपल्या अंगाचे अवयव आहेत. ते कोणी विकत कां असे ते त्याला विचारतात. हया अवयवांच्या बरोबर तात्यांनी एक पिशवी जीवापाड जपलेली असते,  त्या पिशवीत आपला नातू विलासच्या अनेक आठवणी जपलेल्या असतात, त्यात त्याचा भोवरा-कागदी विमान आणि बरचं काही असते.

एक दिवस तात्यांना मुंबईत विमान दिसते , आणि ते म्हणजे तात्यांच्या मनातील “पुष्पक विमान” असते. त्यात त्यांना बसण्याची इच्छा असते. हि त्यांची इच्छा विलास पूर्ण कशी करतो ?, स्मिता त्याला कशी साथ देते?, विमानात बसण्यापूर्वी तात्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागते ?, शेवटी तात्या विमानात बसतात त्यावेळी त्यांना तेथे कोण भेटते ? अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे हया सिनेमात पाहायला मिळतील

हया सिनेमात तात्यांची  मध्यवर्ती व्यक्तिरेखा मोहन जोशी यांनी अप्रतिम केली आहे. खानदेशी भाषा आणि  त्यातील बारीक सारीक छटा खूप छान व्यक्त केल्या आहेत.  सुबोध भावे यांनी विलास अर्थात तात्यांच्या नातवांची भूमिका छान रंगवली आहे. आजोबांविषयीचे प्रेम आणि बायकोवरील प्रेम ह्या दोन्ही भावनांमध्ये होणारी मध्यमवर्गीय माणसांच्या मनाचे हेलकावे त्याने सुरेखं पेश केले आहे. गौरी महाजन हिने स्मिताच्या भूमिकेत दोघांना  उत्तम साथ दिली आहे. वैभव चिंचाळकर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन बंदिस्तपणे केले असून चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. हयातील अभंग /गाणी छान आहेत. एक सुरेख सिनेमा पाहिल्याचे  समाधान नक्कीच मिळेल.

  • – दीनानाथ  घारपुरे  

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

ज्योतिबा डोंगराचे सर्व रस्ते सील

कोल्हापूर – दरवर्षी आज ज्योतिबाची चैत्र यात्रा सुरू होते. हजारो भाविक आजच्या दिवशी डोंगरावर येतात. मात्र आज केवळ मोजक्या पुजाऱ्यांनी पूजा केली. कोरोनामुळे ज्योतिबाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

ससून रुग्णालय अजून सज्ज का नाही?

पुणे – ससून रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. तिथे कोरोना रुग्णांसाठी ८५० खाटांचे स्वतंत्र दालन सुरू होऊ शकते. हे दालन सुरू होईल असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यांतून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More