पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एक संशयीत अटक – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवाद महत्वाच्या बातम्या

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एक संशयीत अटक

पुणे- जम्मु काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याप्रकरणी एका संशयीताला चाकणमधून अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या संशयीताकडे जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट आणि लष्कराची माहिती व इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. शरियत मंडल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आले आहे.

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी बिहार पोलिसांनी सोमवारी पाटणा जंक्शन येथून खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या दोघांच्या चौकशीदरम्यान शरियतचे नाव समोर आले. बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने चाकणमध्ये छापा मारून शरियतला अटक केली. हे तिघे जण इस्लामिक स्टेट बांगलादेश आणि आयसिस सह जमीयत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत.

शरियत मंडलला न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. शरियतने खैरूल मंडल आणि अबू सुलतान या दोघांच्या आपण संपर्कात असल्याचे मान्य केले. मला त्यांची दहशतवादी पार्श्वभूमी माहीत होती. ते मला जिहादबद्दल मौलवीचे व्हिडिओ पाठवत आणि व्हिडिओ कॉल करून दहशतवादी प्रशिक्षण बद्दल माहिती देत. मात्र, मी यातील कोणत्या गोष्टीत सहभागी नाही असे त्याने कोर्टात सांगितले आहे. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या कोर्टने त्याला ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.  पुढील चौकशीसाठी त्याला बिहारला नेण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More