पुलवामा आयईडी स्फोटातील २ जखमी जवान शहीद – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवादी हल्ला देश

पुलवामा आयईडी स्फोटातील २ जखमी जवान शहीद

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले मात्र एक जवान शहीद झाले. सोमवारी काश्मीरमध्ये ३ ठिकाणी चकमक झाली असून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. मात्र या चकमकींमध्ये १२ जवान आणि २ सामान्य नागरिक जखमी झाले. त्यांच्यावर श्रीनगरमधील दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील अचबलमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. याबाबत समजताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी जवान केतन शर्मा शहीद झाले तर २ जवान जखमी झाले. तसेच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्याच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, शहीद जवान केतन शर्मा उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील रहिवासी होते.

तर पुलवामाच्या अरिहल गावात जवानांच्या राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनावर आयईडी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ९ जवान आणि २ नागरिक जखमी झाले यापैकी २ जखमी जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर जवानांनी पूर्ण भागाला घेरले आणि हवेत जोरदार गोळीबार केला. तसेच यानंतर सीआरपीएफच्या १८०व्या बटालियनच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More