पुलवामात चकमकीत ३ दहशतवादी ठार, जवान शहीद – eNavakal
आघाडीच्या बातम्या दहशतवाद देश

पुलवामात चकमकीत ३ दहशतवादी ठार, जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील दालिपोरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याच्ची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार सदर परिसरात घेराव घालून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More
post-image
देश

भाजपाकडे २ हजार कोटी कुठून आले? मायावतींची आगपाखड

नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना जबरदस्त आर्थिक दणका बसला आहे. त्यांचा भाऊ आनंदकुमार याचा नोएडा येथील ७ एकर भूखंड गुरुवारी...
Read More