पुर्नरोपित झाडे जगविण्यास अपयशी! मेट्रो प्रशासनावर हायकोर्टाची नाराजी – eNavakal
News मुंबई

पुर्नरोपित झाडे जगविण्यास अपयशी! मेट्रो प्रशासनावर हायकोर्टाची नाराजी

मुंबई – मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात पुर्नरोपित केलेल्या झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत पुर्नरोपित करण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 44 टक्के झाडे जिवंत असल्याने न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती ए.ए.सय्यद यांच्या खंडपीठाने मेट्रो प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पुर्नरोपित केलेल्या या वृक्षांची तुम्ही काळजी घेताय की नाही, त्यांची योग्य प्रकारे देखभाल होतेय की नाही? असे सवाल उपस्थित करत न्यायालयाने संबंधित अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत या झाडांकडे जातीने लक्ष द्या असे आदेश एमएमआरसीएल प्रशासनाला दिले.
आरे कॉलनीतील कारशेड तसेच मेट्रोच्या विविध कामांसाठी एमएमआरसीएलकडून हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदेशीर असून या समितीला झाडे तोडण्याबाबत निर्णय देण्याचा अधिकार नाही, असा दावा करत सामाजिक कार्यकर्ता झोरू बाथेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी द्विसदस्यीय न्यायमूर्तींची समिती नेमण्यात आली असून न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. यावेळी याचिकाकर्त्यांनी जिओ टॅगिंग करण्यात आलेली झाडे जगतात की नाही याकडे मेट्रोने पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. आतापर्यंत पुर्नरोपन करण्यात आलेल्या झाडांपैकी केवळ 44 टक्के झाडे जगविण्यात यश आले असल्याचा आरोप केला. हा आरोप मेट्रो प्रशासनाने फेटाळून लावला. 20 हजार झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात आले. त्यापैकी नॅशनल पार्क येथे करण्यात आलेल्या सुमारे 10,525 झाडांची देखभाल केली जात असल्याचा दावा केला. याची दखल घेत न्यायालयाने या झाडांच्या देखभालीबाबत दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे आदेश मेट्रो प्रशासनाला दिले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More