पुरुलियात भाजपा कार्यकर्त्यांची हत्या – eNavakal
गुन्हे देश

पुरुलियात भाजपा कार्यकर्त्यांची हत्या

बंगाल – २ दिवसापूर्वी बंगालच्या पुरुलिया भागात त्रिलोचन महतो (18) या तरुण भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह एका झाडाला अडकलेला सापडल्यामुळे बंगालमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यात अजून पुरुलिया जिल्ह्यातील बलरामपूर जिल्ह्यातील दाभा गावामध्ये भाजपच्या कार्यकर्त्या दुलकाल कुमार (32) या खांबाला लटकलेला मृतदेह मिळाल्यामुळे तणाव अजून वाढला आहे. या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्ते मागे तृणमूल काँग्रेस असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

‘भाजपसाठी काम करण्याचे बक्षिस हे आहे’ असे पोस्टर त्रिलोचनच्या मृतदेहाच्या पाटीवर लावण्यात आले होते. या हत्यांचा निषेद करत बंगालच्या भाजपाच्या नेत्यांनी या बंगाल सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. टीएमसीने पश्चिम बंगालला स्मशानात रूपांतर केले आहे. पंचायत निवडणुकांमधील हिंसाचारामुळे आणि आतापर्यंत 18 भाजपा कार्यकर्ते ठार झाले आहेत. असे ही बंगाल भाजपाचे म्हणणे आहे. तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) या 18 वर्षाच्या भाजप कार्यकर्त्याच्या हत्येबद्दल विस्तृत अहवालाची मागणी करण्याची पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठविली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More