पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो – eNavakal
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात दोन रुपये आणि या आठवड्यात एक रुपये किलोमागे साखर महागली आहे.
पूरग्रस्त भागातून मालवाहतूक सुरू झाली असली तरी साखर पोत्यांची वाहतूक करणारे अनेक ट्रक पुरात बुडाल्याने खराब झाले आहेत. सांगलीतील काही महत्त्वाची गोदामे, कराडमधील साखर मीलचे पुराच्या पाण्यात अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरस्थिती सुरळीत होण्यास आणखी किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
दरम्यान अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे मुंबई सचिव रमणिक छेडा म्हणाले की, पुराच्या आधी घाऊक बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो 34 ते 35 रुपयांदरम्यान गेला आहे. उच्च दर्जाची साखर 35 ते-50 रुपये किलो आहे. त्यानुसार आता किरकोळी बाजारात साखर साधारण 40 रुपयांदरम्यान गेली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

मेकअप बॉक्स वाटल्याप्रकरणी प्रणिती शिंदेेंच्या अडचणीत वाढ

सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतरही मेकअप बॉक्सचे वाटप केले असल्याचा आरोप...
Read More
post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More