पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; वीज पडून तिघांचा मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; वीज पडून तिघांचा मृत्यू

मुंबई – पुणे व शहर परिसरात आज सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यासह अकोला आणि कोकणातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पुण्यातील मावळ तालुक्यातील नसावे गावात वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

राज्यात दोन दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पुणे, अकोला, कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पुण्यात सकाळी ऊन पडलेले असताना आज दुपारी 12 च्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली तर उपनगरात चांगलाच पाऊस कोसळला. सहकारनगर, स्वारगेट, सिंहगड रोड, बिबवेवाडी, कोंढवा, सातारा रस्ता परिसर, शिवाजीनगर, टिळक रस्ता या भागामध्ये काहीवेळ जोरदार पाऊस पडला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांनी दुकानांचा आसरा घेतला होता. पावसामुळे मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर मावळ येथे भात कापणीचे काम करत असताना शोभा अंकुश शिरसट (32), खंडू धोंडू शिरसट (55) आणि सुनंदा भाऊ कचरे (40) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. शिर्डी आणि अकोला तालुक्यातही जोरदार पावसाने दुकानांमध्ये पाणी शिरले होते. ऐन दिवाळीच्या गर्दीत दुकानांमध्ये पाणी शिरल्याने बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. काल रात्री 100 मिमिच्या आसपास पाऊस झाला असून अकोले शहरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More