पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या

पुणे – पुण्यात काही दिवसांपासून बेपत्ता असलेले माहिती अधिकारी कार्यकर्ता विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. विनायक सुधाकर शिरसाट काही दिवसांपासून बेपत्ता होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी देण्यात आली होती. सोमवारी दुपारी मृतदेह मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान घाटात खोल दरीत एका कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More