पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

पुणे – प्रियकराकडून प्रेयसीची धारदार शस्त्राचे हत्या केल्याची संतापजनक घटना पुण्यातील चंदननगर भागात घडली आहे. काल रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून २५ वर्षीय आरोपी किरण शिंदे फरार आहे. तो हिंजवडीतील आयटी कंपनीत कामाला होता. नोकरी करत असतानाच तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतही होता. तर याच परिसरात पूर्वी मीना पटले (वय २३) ही तरुणी रहायची. यादरम्यान किरणची तिच्याशी ओळख झाली. मीना ही मूळची गोंदिया येथील रहिवासी होती. ती पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तसेच एका कॉल सेंटरमध्येही काम करत होती. या दोघांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते.

मीनाचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय किरणला होता. मंगळवारी रात्री त्याने तिला भेटायला बोलावले आणि तिच्यावर चाकूने वार केले. या घटनेनंतर तो पसार झाला आहे. या हल्ल्यात गंभीर झालेल्या मीनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More