पुण्यात ‘तुफान’ पाऊस! झाड कोसळून बसचालकाचा मृत्यू – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात ‘तुफान’ पाऊस! झाड कोसळून बसचालकाचा मृत्यू

मुंबई – पुण्यात आज पुन्हा एकदा तुफानी पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला. वादळी वार्‍यासह कोसळलेल्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली होती. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. ग्राहक पेठ येथे पीएमपीच्या बसवर सोसाट्याच्या वार्‍यामुळे मोठे वडाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत बसचालक बंडू नवगुणे यांचा मृत्यू झाला.

अलका टॉकीज रोड, सिंहगड रोड, कर्वेे रोड परिसरात पाणी साचल्याने याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. पुण्यातील दांडेकर पुलावर आंबील ओढ्यातून आलेले पाणी नागरी वस्तीत शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली होती. पुढील चार दिवस पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, कोकणातील खेड, दापोली, चिपळूण परिसरातही वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला. तर मुंबईसह कल्याण, डोेंबिवली, ठाणे, नवी मुंबईतही पावसाचे धुमशान सुरु होते.
पुणे शहर व परिसरात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. त्यामुळे अंधार पडण्यापुर्वीच सर्वत्र अंधाराची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे शहरातील परिसरात पाणीचपाणी साचले होते. अलका टॉकीज रोड, सिंहगड रोड, कर्वेे रोड, शिवाजी नगर, संतोष हॉल येथील मधुकर हॉस्पीटल येथे पाणी साचले होते. गुडघाभर पाणी साचलल्याने याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातही पावसाचे पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडाली होती. त्यातच जोरदार वारा असल्याने टिळक रोड परिसरात ग्राहक पेठेसमोरुन जात असलेल्या एका पीएमपीएल बसवर मोठे वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पीएमपीएलचा बसचालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. मुसळधार व वादळी वार्‍यामुळे सनसिटी रोडवर अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच शहरातील सहकार नगर परिसरात रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे येथील दुचाकी पुर्णपणे पाण्याखाली गेल्या होत्या.
पुण्यावर 15 किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
दरम्यान, मुंबईसह, कल्याण, डोेंबिवली, चिपळूण आणि खेड परिसरातही आज विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे परिसरातील काही भागांत सखल पाणी साचले होते. याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. पावसामुळे खेडमधील 130 गावांचा विजपुरवठा खंडित झाला होता. तर कल्याण, डोंबिवली परिसरात आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. ठाणे, नवी मुंबईतील बेलापूर, खारघर, जुईनगर येथे अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More