पुण्यात ‘कोयता गँग’कडून भरदिवसा दहशत पसरवण्याचा प्रयत्न – eNavakal
News महाराष्ट्र

पुण्यात ‘कोयता गँग’कडून भरदिवसा दहशत पसरवण्याचा प्रयत्न

पुणे – पुण्यातील लष्कर भागातील काही दुकानांमध्ये एका टोळक्याकडून हातामध्ये कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे लष्कर भागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदित्य ऊर्फ मन्या भोसले याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी लष्कर भागातल्या न्यू मोदीखाना भागातल्या गुडलक चौकातील काही दुकानदारांकडून हातात कोयते घेऊन भीती दाखवून हप्ते घेण्याचा प्रयत्न केला होता.
काही दुकान चालकांनी त्यांना हप्ता देण्यास नकार दिल्याने त्यांनी दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर दुकानदारांच्या तक्रारीवरुन या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात
आले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More