पुण्यातून चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या महिलेस अटक – eNavakal
News मुंबई

पुण्यातून चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या महिलेस अटक

मुंबई- पुण्यातून एका चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या एका महिलेस बुधवारी ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मनिषा काळे असे या महिलेचे नाव असून भिकेसाठी तीने ते मूल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अटकेनंतर तिचा ताबा पुणे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

चार महिन्यांचा हा मुलगा त्याच्या आईसोबत पुणे येथे राहतो. पुणे मंडई त्याची आई त्याला घेऊन भीक मागते. 17 ऑगस्टला ती तिच्या मुलासोबत पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनजवळ झोपली होती. यावेळी तिथेच झोपलेल्या दोन महिलांनी चार महिन्याच्या मुलाचे अपहरण केले होते. दुसर्‍या दिवशी तिचा मुलगा तिथे नसल्याने तिने पुणे रेल्वे पोलिसांत मुलाची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी मनिषा ही पुण्याला गेली होती. पुण्याहून ती एका चार महिन्यांच्या मुलासोबत मुंबईत आली होती. ओशिवरा येथे राहणार्‍या मनिषाकडे एक मूल असल्याची माहिती मिळताच एका दक्ष नागरिकाने ही माहिती ओशिवरा पोलिसांना दिली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पास्लवार यांच्या पथकाने तिथे जाऊन मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ते मूल चोरी केल्याची कबुली दिली. भीक मागण्यासाठी तिने या मुलाचे अपहरण केले होते. ही माहिती नंतर पुणे रेल्वे पोलिसांना देण्यात आली. मुलासह मनिषाला रात्री उशिरा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
विदेश

श्रीलंकेत चर्च, हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट

कोलंबो – कोलंबोतील आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे समजते आहे. यामध्ये ५ चर्च आणि ८ हॉटेलचा समावेश असून या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात...
Read More
post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More