पुण्यात प्रिंटिंग प्रेसला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू – eNavakal
अपघात महाराष्ट्र

पुण्यात प्रिंटिंग प्रेसला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

पुणे – शिवाजीनगर येथे भोसले जलतरणासमोर एका प्रिंटिग प्रेसला आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आग शेजारील दुकानांमध्ये पसरून चार दुकाने जळून खाक झाली आहे. ही घटना आज (बुधवारी) पहाटे तीनच्या सुमारास घडली. शिवाजीनगर बस स्टॅण्डजवळ हिमालया हाईट्स बिल्डिंगमध्ये असलेल्या प्रिंटिंग प्रेसला आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. प्रेस बाहेरून बंद असल्याने प्रेसच्या आतमध्ये असलेल्या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
मयतांची नावे अद्याप समजलेली नाही. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी तातडीची कारवाई केली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने आणि प्रेस बाहेरून बंद असल्याने दोघांचा मृत्यू झाला. आग एवढी भीषण होती की प्रेसच्या शेजारी असलेली चारही दुकाने जळून खाक झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

विदर्भात पावसाची हजेरी! वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

नागपूर- मागील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून गेल्या 24 तासात वर्धा जिल्ह्यात 116 मिलीमीटर एवढा सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाकडून...
Read More
post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More