पुण्यातील वकिलांचे खंडपीठासाठी ‘कामबंद सुरू’  – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

पुण्यातील वकिलांचे खंडपीठासाठी ‘कामबंद सुरू’ 

पुणे – विधानसभेत ठराव झाल्यानंतरही गेल्या 40 वर्षांपासून असलेल्या पुण्याच्या खंडपीठाच्या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यावरदेखील राज्य शासन कोल्हापूरला झुकते माप देत असल्याच्या निषेधार्थ आज पुणे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये वकिलांनी ‘कामबंद’ चे हत्यार उपसले.
कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने खंडपीठाबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी कोल्हापूरला खंडपीठ, त्याच्या उभारणीसाठी जागा आणि 100 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले़ त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि विधी व न्याय विभागाच्या सचिवांना पत्र देण्याचे निर्देशही तातडीने देण्यात आले़  ही माहिती पुण्यात आल्यानंतर शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांमध्ये एकच खळबळ उडाली. यात पुणे येथे खंडपीठाबाबत कोणताही उल्लेख नसल्याचे समजल्याने वकिलांनी संताप व्यक्त केला़ दुपारी तातडीने वकिलांची अशोका हॉलमध्ये बैठक घेउन कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड़ हेमंत झंजाड यांनी दिली़

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाच्या वाढदिवसाचे ‘हे’ फोटो पाहिलेत?

माले – अभिषेक-ऐश्वर्या या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडीच्या लग्नाला शनिवारी तब्बल १२ वर्ष पूर्ण झाली. आपल्या लग्नाचा १२ वा वाढदिवस या दोघांनी मालदीवमध्ये साजरा केला....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More