पुण्यातील रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे टाकून घातपात घडवण्याचा प्रयत्न – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

पुण्यातील रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे टाकून घातपात घडवण्याचा प्रयत्न

पुणे – पुणे रेल्वे विभागात येणार्‍या अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर लोखंडी तुकडे टाकून मोठा अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली. मागील 3-4 महिन्यांत जवळपास 8 ते 10 वेळेस या घटना पुणे रेल्वे विभागात घडल्या असून याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली.

सुदैवाने या सगळ्या घटनांमध्ये लोको पायलट आणि रेल्वे अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे हे अपघात टाळण्यात रेल्वे विभागाला यश मिळाले आहे. एप्रिल महिन्यात हातकणंगले परिसरात दोन वेगवेगळया ठिकाणी अज्ञात लोकांनी लोखंडी तुकडे रेल्वे रुळावर टाकून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच तळेगावमध्ये कामशेत येथे हैद्राबाद मुबई एक्सप्रेसलादेखील लक्ष करण्यात आले होते. पुण्यातील रेल्वे मार्गावरुन हैद्राबाद -ओडिशा आणि इतर राज्यांत जाणार्‍या अनेक रेल्वे गाड्या धावतात, त्यामुळे हा मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. असे प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More