पुण्यातील रामोशीवाडीत बिबट्या मृतावस्थेत आढळला – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यातील रामोशीवाडीत बिबट्या मृतावस्थेत आढळला

पुणे – पुण्यातील म्हातोबाची आळंदी येथील रामोशीवाडीत आज एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेथील स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळविताच वनविभागाचे अधिकारी व लोणी काळभोर पोलीस दाखल घटनास्थळी झाले व त्यांनी पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत आढळला.

लोणी काळभोर येथून काही अंतरावर असलेल्या आळंदी म्हातोबाची या गावातील शिवारात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या या परिसरात पाण्याचा शोधात आला असण्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला. मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील शेतकरी शेतात गेला असता त्याला निपचित पडलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याने ही माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी शिवाराकडे धाव घेतली आणि जवळ जाऊन पाहिले असता हा बिबट्या मृत्यमुखी पडल्याचे आढळले. दरम्यान मृतावस्थेत बिबट्या आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More