पुण्याकडून गतविजेत्या एटीकेची हार – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

पुण्याकडून गतविजेत्या एटीकेची हार

पुणे  – हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीने आपल्या मोहीमेला गती देताना गतविजेत्या एटीकेवर 3-0 असा दणदणीत विजय मिळविला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुण्याच्या आदिल खान, दिएगो कार्लोस आणि रोहित कुमार यांनी प्रेक्षणीय गोल करीत चाहत्यांना आनंदित केले.
पुण्याने 11 सामन्यांत सहावा विजय मिळविला. एक बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पुण्याचे 19 गुण झाले. चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या पराभवानंतर जोरदार विजय मिळविणे पुण्यासाठी महत्त्वाचे ठरले. उत्तरार्धात प्रतिस्पर्ध्याचे गोल होऊ न देण्यातही पुण्याला यश आले. बेंगळुरू एफसी (21 गुण) आघाडीवर, तर चेन्नईयीन एफसी (20) दुसऱ्या स्थानावर आहे. एटीकेला दहा सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला.
पुण्याने घरच्या मैदानावर आत्मविश्वासाने सुरवात केली. दुसरीकडे एटीकेला झगडावे लागत होते. 32 व्या मिनीटाला मार्सेलिनीयोने डावीकडून कॉर्नरवर छान चेंडू मारला. त्यानंतर आदिलने उडी घेत ताकदवान हेडींग केले आणि एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याला चकविले. ­मध्यंतरास पुण्याने एका गोलची आघाडी राखली.
उत्तरार्धात ब्राझीलच्या कार्लोसने स्पर्धेतील पहिल्या गोलची प्रतिक्षा संपुष्टात आणली. त्यानंतर त्याने भावपूर्ण जल्लोष केला. 77 व्या मिनीटाला सार्थक गोलुईने उजवीकडून रोहितला पास दिला. रोहितने एटीकेच्या बचावपटूंना चकवित ताकदवान किक मारत गोल केला. त्यानेही गोलनंतर प्रेक्षकांना भावपूर्ण अभिवादन केले.
एटीकेला अखेरच्या मिनीटाला आणखी हताश व्हावे लागले. झीक्यूईन्हाच्या क्रॉस पासवर रॉबीन सिंगने हेडींग केले. चेंडू नेटमध्ये गेला, पण तोच ऑफसाईडचा इशारा झाला. पुर्वार्धात एटीकेला काही संधी मिळाल्या. 30 व्या मिनीटाला प्रबीर दासने दिलेल्या सुंदर पासनंतर झीक्यूइन्हाने मारलेला चेंडू पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या हातात गेला. ३६व्या मिनीटाला रायन टेलरने कॉर्नरवर मारलेला चेंडू कॉन्नर थॉमस याच्या पायापाशी पडला. त्याला पुण्याच्या ज्युवेल राजाने रोखण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू जॉर्डी माँटेल याच्यापाशी गेला. त्यावेळी माँटेलला संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू नेटवरून बाहेर गेला. 43 व्या मिनीटाला रायन टेलरने स्वैर फटका मारत संधी दवडली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More