पुणे-बेंगळुरू महामार्गावर अपघात, ४ ठार २ गंभीर  – eNavakal
News महाराष्ट्र वाहतूक

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अपघात, ४ ठार २ गंभीर 

पुणे – बेंगळुरू महामार्गावर भरधाव कंटेनर व बोलेरो जीप एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला. या अपघातात चार जण ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोघेजण कोल्हापूर येथील रहिवासी आहेत.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील महात्मा गांधी हॉस्पिटलजवळील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरून माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर (के ए ५२-५७१४) माल घेऊन पुण्याहून बेळगावकडे निघाला होता. निपाणीतील महात्मा गांधी हॉस्पिटलशेजारी आल्यानंतर कंटेनरचा पुढील टायर फुटला. त्यामुळं चालकाचा ताबा सुटून कंटनेर दुभाजकावरून पलीकडच्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी घटप्रभा येथून भाजीपाला घेऊन बुलेरो (एमएच 09 सीए 8850) जीप कोल्हापूरकडे निघाली होती. कंटेनरनं तिला समोरून जोराची धडक दिली. यात कंटेनर चालक रमेशसह (वय ४०, रा. कळगेडे, जि. राणेबेन्नूर), बोलेरोमधील शब्बीर सय्यद (वय २८, रा. कळंबा-कोल्हापूर), राजमहमद बागवान (वय ३७, बागवानगल्ली-निपाणी) व नदीम बागवान (वय ३१, रा. दांडगेवाडी-कोल्हापूर) हे चौघे जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यात कंटेनरचा क्‍लिनर आनंद लमाणी व फय्युम बागवान यांचा समावेश आहे. पैकी फय्युमची प्रकृती चिंताजनक आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत दाखल

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांंतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याने सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण...
Read More
post-image
मुंबई

दिव्यांग महिलांच्या सहाय्याने साकारले लालबागच्या राजाचे मोझॅक पोट्रेट, ३६ हजार फुलांचा वापर

मुंबई – बोरिवलीत राहणाऱ्या कलाकार श्रुतिका शिर्के- घाग यांनी तब्बल ३६ हजार कागदी फुलांचा वापर करून लालबागच्या राजाचे अनोखे मोझॅक पोट्रेट साकारले आहे. ह्यामध्ये ६...
Read More
post-image
मुंबई

दिव्यात प्रवाशांची ससेहोलपट! बस थांब्यावर शेड नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

ठाणे –  ठाणे महानगरपालिकेचे उपेक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या दिवा शहरात लोकल बंद असल्याने नोकरदारांची ससेहोलपट होत आहे. कामाच्या निमित्ताने दिव्यातून बाहेर पडण्यासाठी बससेवेव्यतिरिक्त दुसरा...
Read More
post-image
मनोरंजन

रील आणि रियल नायकांसह ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ चे नवे व्हर्जन

मुंबई – सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे, यंदाचा गणेशोत्सव थोडा वेगळा जरी असला तरी, बाप्पाच्या आगमनाची आतुरता प्रत्येकाला आहे. हीच आतुरता लक्षात घेत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा प्रस्ताव, मंजूर झाल्यास १३ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली -रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा सुविधा आधीपासूनच सुरू आहे. मात्र, त्यात आता अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. सध्या या नव्या आरोग्य...
Read More