पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा दु. ३ वाजता केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या महिला गटासाठी राखीव होते. तर राष्ट्रवादीकडून १७ महिला उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळाली होती. अखेर निर्मला पानसरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असून पक्षाकडे ४५ जागा आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांची शुक्रवारी भेट घेतली होती.