मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला हा मान्सूसनपूर्व! ‘खरा’ पाऊस उद्या होणार दाखल – eNavakal
महाराष्ट्र मुंबई हवामान

मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला हा मान्सूसनपूर्व! ‘खरा’ पाऊस उद्या होणार दाखल

मुंबई – हवामान विभागाने काल व्यक्त केलेला पुढील 6 दिवस पावसाचा अंदाज आज खरा ठरला. मुंबईसह राज्यात आज पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. धो-धो कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. विशेष म्हणजे या पावसाचा परिणाम पहिल्यांदाच विमान वाहतुकीवर झाला. पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे वाहतुकही उशिरा धावत होती. राज्यातील नाशिक, सोलापूर, नांदेड या परिसरातही मुसळधार पाऊस कोसळला. हा मान्सूनपुर्व पाऊस असला तरी खरा पाऊस उद्या 8 जूनला दाखल होणार आहे.
मुंबई- सोमवारी सायंकाळी मुंबईत जोरदार पाऊस पडल्यानंतर पाऊस गायब झाला होता. गेले दोन दिवस मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. त्यातच आज हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. लालबाग, गिरगांव, परळ, दादर, माहिम, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार बॅटींग केली. मुसळधार बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गुढघाभर पाणी साचल्याच्या घटना घडल्या. दादर, परळ, हिंदमाता परिसरातील सखल भागांत पाणी साचले होते. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाऊन गाड्या ूबंद पडल्या होत्या. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्याने रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला.मध्य रेल्वेच्या अप-डाऊन दिशेच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. विशेष म्हणजे आज कोसळलेल्या पावसाचा पहिल्यांदाच विमान वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. लंडनवरून मुंबईला आलेले जेट एअरवेजचे विमान हैदराबादला वळवण्यात आले होते.
नाशिक, सोलापूर, नांदेड, सातारा परिसरातही पाऊस कोसळला. सोलापूर परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. काळ्या ढगांच्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर काही वेळ अंधार पसरला होता. धो-धो कोसळलेल्या पावसामुळे सम्राट चौक, बाळीवेस, एसटी स्टँड परिसर, पुना नाका परिसरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. सातार्‍यातील महाबळेश्वरमध्येही मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली होती. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात जोरदार पाऊस कोसळला.
दरम्यान, उद्या 8 ते 10 जून दरम्यान मुंबईसह रायगड आणि ठाणे या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तसेच येत्या 24 तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने सर्व अधिकार्‍यांची येत्या शनिवार आणि रविवारची सुट्टी रद्द केली आहे. तसेच, सर्व संबंधितांना अधिक सजग व सतर्क राहण्याचे महापालिका प्रशासनाने आदेश दिले आहेत.

नागरिकांनो अशी घ्या दक्षता…

  • मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
  • घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
  • अति मुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रवास टाळा.
  • घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वे व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.
  • पावसात विजा चमकताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशावेळी पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
  • आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा.
  • मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा.
  • हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी.
  • कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.  कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन  घ्यावी.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More