पी. व्ही. सिंधूची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक   – eNavakal
क्रीडा देश

पी. व्ही. सिंधूची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक  

नवी दिल्ली – गत चॅम्पियन भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग दुसऱ्यांदा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. थायलंडच्या तृतीय मानांकित रतचानोक इंतानोन हिच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवताना महिला एकेरीमध्ये फायनलमध्ये धडक दिली आहे. आज अंतिम सामन्यात अमेरिकेच्या बेवेन झांगसोबत पी.वी सिंधूची लढत रंगणार आहे.

अव्वल मानांकित सिंधूने सिरी फोर्ट क्रीडाग्राममध्ये एक तास चाललेल्या उपांत्य फेरीत आक्रमक खेळ करताना इंतानोन हिचा ४८ मिनिटांत २१-१३, २१-१५ असा पराभव केला. इंतानोनविरुद्ध सिंधूचा हा सलग दुसरा विजय आणि सात सामन्यात एकूण तिसरा विजय आहे. आज होणाऱ्या अंतिम फेरीत तिची लढत अमेरिकेच्या पाचव्या मानांकित बेवेन झांग हिच्याविरुद्ध होईल. बेवेन झांगने सेमीफायनलमध्ये हाँगकाँगच्या चेयुंग नगान यी हिला 14-21, 21-12, 21-19 ने पराभूत केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More