जोधपूर – अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे शनिवारी जोधपूरच्या उम्मेद भवन येथे ख्रिश्चन पद्धतीने लग्न बंधनात अडकले. ख्रिश्चन विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे आतषबाजी करण्यात आली होती. मात्र, प्रियांका ही आस्थमा मोहिमेची ब्रॅंड अॅम्बेसेडर असूनही आपल्याच लग्नाला आतषबाजी करत असल्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलच ट्रोल करण्यात आले. आस्थमा मोहिमेची ब्रॅंड अॅम्बेसेडर असताना आतषबाजी करणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
एकीकडे सर्वाेच्च न्यायालयाने फटाके फोडण्यास मनाई केली असताना सेलिब्रिटींना कोणी फटाके फोडण्याची परवानगी दिली? त्यांना कोणीच कसे थांबवत नाही? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.
#WATCH: Fireworks at Umaid Bhawan Palace in Jodhpur, Rajasthan, after Priyanka Chopra and Nick Jonas tied the knot as per Christian rituals. pic.twitter.com/XpzYtGZG2G
— ANI (@ANI) December 1, 2018
#Fireworks at Umaid Bhawan Palace in Jodhpur, Rajasthan, after Priyanka Chopra and Nick Jonas tied the knot is ok ?? what happened to ban?? Is this not causing #pollution ?
Or #SupremeCourt and activists have allergy with #Diwali firecrackers only ?#firecracker pic.twitter.com/RzLYElyTAN— $weet ¢andy® 📚 (@Sweetu0901) December 2, 2018