पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर 16 जुलैला सुनावणी – eNavakal
News मुंबई

पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर 16 जुलैला सुनावणी

मुंबई – बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीने दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने 16 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शस्त्रक्रियेनंतरच्या रिकव्हरी ट्रिटमेंटसाठी पीटर रूग्णालयात दाखल आहे. त्याला 17 जुलैनंतर पुन्हा जेल वॉर्डात हलवण्यात येणार असल्याने न्यायमूर्ती रेवती मोहित डेरे यांनी पीटरच्या जामीन अर्जावरील सुनावणी 16 जुलैपर्यंत तहकूब करत पुढील सुनावणीला जेजे रुग्णालयातील डॉक्टरांना वैद्यकीय अहवालासह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पीटर मुखर्जीने बायपास सर्जरी झाल्यानंतर तुरुंगात आजारपण बळावण्याची शक्यता असल्याने आपल्याला वैद्यकिय कारणास्तव जामीन मिळावा म्हणून कनिष्ट न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पीटरच्यावतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी न्यायालयाच्या आदेशानुसार पीटरला त्याच्या पसंतीच्या खासगी रूग्णालयात 15 दिवस दाखल करण्यास परवानगी देताना त्याचा प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला दिले होते. न्यायालयाने आज जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांना पीटरच्या वैद्यकीय अहवालासह हजर राहण्याचे निर्देश देताना अर्जाची पुढील सुनावणी 16 जुलैला निश्चित केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ४३.७०% मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More