पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेधारकांचा संताप – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेधारकांचा संताप

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबरपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे पीएमसीच्या विविध शाखांमध्ये आज खातेधारकांनी मोठी गर्दी केली आहे. खातेधारकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक खातेधारकांनी यासंबंधी ट्विट करून तक्रारी केल्या आहेत.

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने कलम ३५ ए अंतर्गत ‘प्रॉम्प्ट करेक्टीव्ह एॅक्शन’ घेतली आहे. त्यामुळे या बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्विकारता येणार नाही. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी खातेदारांना सहकार्य करण्याच्या आवाहन केले आहे. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल, असे थॉमस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खातेधारकांकडून आरबीआयच्या या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून सहा महिन्यांतून एकदाच पैसे काढायचे, मग मुलांच्या शाळेची फी, आजारपणात पैसे खर्च कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. भाईंदर, अंधेरी, बोरीवलीपासून धुळ्यापर्यंत विविध भागांतील पीएमसीच्या शाखेबाहेर मोठी गर्दी दिसत आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More