पीएमपीच्या ताफ्यातील ई-बसेसला चांगला प्रतिसाद – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

पीएमपीच्या ताफ्यातील ई-बसेसला चांगला प्रतिसाद

पिंपरी – गेल्या दीड महिन्यांपूर्वी पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-बसला प्रवाशांचा पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असणार्‍या ई-बसमुळे पीएमपीच्या खर्चात कपात झाली असून उत्पन्नातही भर पडली आहे. सद्यस्थितीत निगडी आगारातून सुटणार्‍या 10 बस असून प्रत्येक बसमागे पीएमपी’ला दिवसाचे उत्पन्न आठ ते नऊ हजार मिळत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर ई-बस या वातानुकूलित असल्याने प्रवाशी या बसेसना प्राधान्य देत आहेत. सध्या पुण्यामध्ये बस पार्किंगचा अभाव असल्याने ई-बसची सर्व वाहने निगडी आगारात ठेवली जातात. या ठिकाणी सहा चार्जिंग स्टेशनवर बस चार्जिंग होतात. तीन ते चार तासांच्या चार्जिंगसाठी पीएमपीला प्रतियुनिट आठ रुपये खर्च येत आहे. बस चार्जिंग झाल्यानंतर सुमारे 200 ते 225 किलोमीटर धावत आहे. सध्या शहरातील आकुर्डी ते मनपा आणि हिंजवडीच्या विविध मार्गावरील बसला प्रतिसाद वाढत आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड शहराला दहा ई-बस देण्यात आल्या आहेत. या सर्वच बसेस मार्गावर धावत असल्याने निगडी आगाराच्या उत्पन्नात भर पडत आहे. निगडी आगार प्रमुख संतोष गव्हाणे म्हणाले की, ई -बसला नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. बस सुरू झाल्यापासून उत्पन्नातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या बसमुळे प्रदूषण कमी होत असल्याने ई-बसने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत. दरवर्षी शेकडो भारतीय भाविक शंकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालय आज गुरुवारी दुपारी 3 वाजता आपला निर्णय...
Read More