पितृपक्ष जीवनविषयक श्रध्देचा पर्वकाळ – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

पितृपक्ष जीवनविषयक श्रध्देचा पर्वकाळ

संपूर्ण समाज ज्या एका विशिष्ट भावनेने आपल्या मानवी जीवनाचा प्रवास सुखकर करू इच्छितो ती श्रध्दा त्याचे सर्वात मोठे शक्तीस्थान असते. जीवनाविषयीच विश्वास वाटत नसेल तर ते जीवन यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे स्वत:च्या जीवनाविषयी श्रध्दा असणे आणि आपले जीवन यशस्वी करण्यासाठी त्याचा आधार घेणे खूप गरजेचे असते. श्रध्दा या संकल्पनेमध्ये विश्वास किंबहुना निष्ठा या दोन बाबी प्रामुख्याने अंतर्भूत होतात. ज्यातून स्वत:बरोबर समाजाच्या किंवा एकूण सर्व सृष्टीच्या हिताचाच विचार केला जातो. आपले अस्तित्व मान्य करून इतरांच्या अस्तित्वाला केवळ मान्यता देणे नव्हे तर साहाय्यभूत होणे आणि अशा भावनिक सहचर्यातून जीवन विषयक सुखरूप प्रवासाची कामना करणे हा एकमेव उद्देश त्या श्रध्देशी निगडित असतो. भारतीय संस्कृतीने यासाठीच श्रध्दा या संकल्पनेचा अतिशय उदात्त स्वरूपात गौरव केलेला पाहायला मिळतो. भाद्रपद वद्यप्रतिपदा ते अमावस्या या काळात जो पितृपक्ष सुरू होतो त्याला श्राध्दपक्ष असेही म्हटले जाते. श्रध्देने केले जाते ते श्राध्द ही त्याची अतिशय सोपी व्याख्या झाली. परंतु श्राध्द म्हटले की पितरांना केले जाणारे तर्पण किंवा पिंडदान अशाच प्रकारची एक समजूत श्राध्द या शब्दाशी निगडित झालेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या पंधरा दिवसात पितरांविषयी श्रध्दा व्यक्त करण्याचा काळ नक्की झाला. त्यांना तृप्त करण्यासाठी तर्पण किंवा पिंडदान हा विधी सुरू झाला. त्या विधीला श्राध्द म्हणण्याचीही प्रथा पडली. यासंदर्भात अशीही एक समजूत आहे की सर्वसाधारणपणे मानवाचे एक वर्ष म्हणजे पितरांचा संपूर्ण एक दिवस समजला जातो. आपल्या कालमानामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन अशाही दोन बाबी पाळल्या जातात. दक्षिणायनात दक्षिण धृवावर सहा महिने दिवस असतो. दक्षिणायनाचा आरंभ आणि समाप्ती या गोष्टी लक्षात घेतल्या तर हा भाद्रपद वद्य पक्ष त्या दक्षिणायनाचा अपराह्न काळ म्हणजेच भोजनकाल म्हणावा लागतो. दक्षिण धृव हे पितरांचे वसतिस्थान मानले जाते. या काळात पितर अधिक कार्यप्रवण असतात अशा समजूतीमुळे भाद्रपद महिन्यात येणारा हा पंधरा दिवसांचा कालावधी पितरांना जेऊ घालण्यासाठी किंवा संतुष्ट करण्यासाठी निश्चित केला गेला. गेलेल्या पितरांविषयीची श्रध्दा व्यक्त करण्याचा हा काळ म्हणूनच श्राध्द या नावाने रुढ झालेला दिसतो.

मानवी मूल्यांचे जतन

गेलेल्या व्यक्तीविषयीसुध्दा श्रध्दा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याची किंवा आदर दाखवण्याची ही पध्दत व्यापक अर्थाने एका संस्काराचा भाग ठरते. त्यामधूनच स्वार्थीपणाला तिलांजली द्यायची आणि सर्वसमावेशक अशा समर्पण भावनेचे तर्पण करायचे या दृष्टीकोनातून सुरु असलेली ही प्रथा तितक्याच आत्मियतेने समजून घेतली पाहिजे. कारण त्याचा थेट संबंध हा व्यक्तीच्या जगण्याशी असतो. प्रदीर्घ काळ आपल्याबरोबर राहिलेल्या आणि आपल्यामधून निघून गेलेल्या व्यक्तींचेसुध्दा स्मरण ठेवणे ही गोष्ट एकूणच मानवी मूल्याचे संवर्धन करणारी आहे. गेलेल्या व्यक्तींविषयी जर आपण अशाच प्रकारे श्रध्दा दाखवत असू तर आपल्या बरोबरीने राहणार्‍या कुटुंब किंवा समाजातल्या लोकांशीसुध्दा तितकाच आदरयुक्त व्यवहार आपल्याकडून घडला पाहिजे. किंबहुना तो घडावा म्हणूनच अशा प्रकारची व्यवस्था किंवा रचना केली गेली असावी. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मनुष्य किंवा समाज हा विविध प्रकारच्या भावना आणि श्रध्दांच्या माध्यमातून आपला जीवनप्रवास अधिक सुखकर आणि आनंदमय करण्याचा प्रयत्न करतो. ज्यामधून अधिकाधिक मानवी मूल्याचे संवर्धन होऊ शकते. ही मूल्येच एकमेकांना साहाय्यभूत ठरतात. सृष्टीतल्या चैतन्याविषयीचे अशा प्रथांमधून आणि परंपरांमधून एकाअर्थी नकळतपणे चिंतन घडत असते. अशा गोष्टींना सरसकट अंधश्रध्दा म्हणून ठोकरून लावणे चुकीचे ठरते. स्वत: मधल्याच प्रामाणिकतेचे कृतज्ञतेने केलेले स्मरण परंपरांच्या रूपाने आकाराला येत असते. ज्यामध्ये मनुष्याच्या किंवा समाजाच्या चांगुलपणाचा विचार नसेल त्याला आपण निश्चितच अंधश्रध्दा म्हणता येऊ शकते. मात्र ज्या ज्या गोष्टीतून सह्रदयता व्यक्त होते ती ती गोष्ट श्रध्दायुक्त आणि जीवनप्रवाह अधिक निर्मळ करणारी ठरत जाते. या केवळ समजूती आहेत. त्याला कोणताही शास्रीय आधार नाही असेही अनेकवेळा सरसकटपणे बोलले जाते. परंतु ज्याला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. ज्याला सृष्टीच्या चैतन्याचे अनुभव घ्यायचे आहेत त्याला त्याची निश्चितच प्रचिती येऊ शकते.

पितरांविषयीचा महोत्सव

गेलेल्या माणसाला पाणी देणे हा केवळ कर्मकांडाचाही भाग असेल परंतु त्यातल्या देणे किंवा आदरभाव व्यक्त करणे तशी भावना मनामध्ये निर्माण करणे ही गोष्ट अधिक मूलगामी ठरते. सर्वाभूती परमेश्वर असे तत्व स्वीकारलेल्या भारतीय संस्कृतीने सर्व गोष्टी ज्ञानाच्या आधारावर साकार केल्या आहेत. म्हणूनच आज प्रदीर्घ काळानंतरही त्याचे महत्त्व टिकून राहिले. थोडक्यात सांगायचे तर कोणताही उत्सव असो किंवा पितृपक्ष असो. खरे तर या पितृपक्षालाही महालया म्हटले जाते. आणि तोदेखील पितरांविषयीचा महोत्सव मानला जातो. कारण ते या दिवसात आपल्या घरी येतात. त्यांचे भावनिक आदरातिथ्य यानिमित्ताने होते. या दृष्टीकोनातून हा काळदेखील तितकाच शुभ मानला जातो त्याला अशुभ ठरण्याची चूक नकळतपणे अनेकांकडून होते. या काळात पितरांविषयीच्याच गोष्टींना प्राधान्य दिले गेले असल्याने इतर कार्ये करण्याला वेळही मिळत नाही. संपूर्ण चातुर्मासात विवाहासाठी मुहूर्त देखील नसतात. अशावेळी पितृपक्षात विवाहासारखे प्रसंग होऊ शकत नाहीत. परंतु अन्य कोणत्याही गोष्टी करायला हा काळ वर्ज्य मानला गेला नाही. गणेशभक्तीसाठी दहा दिवस, देवी उत्सवासाठी नऊ दिवस त्याचप्रमाणे पितरांच्या उत्सवासाठी पंधरा दिवस अशीच त्यामागची श्रध्दायुक्त भावना आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More