पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी अटकेत – eNavakal
गुन्हे मुंबई

पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी अटकेत

बिल्डरकडे कामाला असताना घोटाळा केल्याचे तपासात उघड

मुंबई – पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका 23 वर्षांच्या आरोपीस गुरुवारी वाकोला पोलिसांनी अटक केली. दिपुंज गुप्ता असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन धनादेश जप्त केले आहे. दिपुंज हा एका नामांकित बिल्डरकडे कामाला होता, तिथे काम करताना त्याने हा संपूर्ण घोटाळा केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादचा रहिवाशी असलेला दिपुंज हा कॉमर्स पदवीधर आहेत. काही वर्षांपासून तो सांताक्रुज येथील कल्पतरु बिल्डरकडे कामाला होता. त्यांच्या अकाऊंट विभागात काम करताना त्याने तिथे चालणार्‍या सर्व व्यवहाराची माहिती जाणून घेतली होती. सप्टेंबर ते डिसेंबर 2017 दरम्यान त्याने काही लोकांकडून गाळा आणि फ्लॅट खरेदीच्या नावाने एनईएफटीद्वारे त्याच्या बँक खात्यात सुमारे पावणेपाच कोटी रुपये घेतले होते. ही रक्कम जमा झाल्यानंतर तो अचानक काम सोडून पळून गेला होता. काही महिन्यानंतर संबंधित व्यक्तींनी या कार्यालयात धाव घेऊन त्यांच्या गाळा आणि फ्लॅटसंदर्भात चौकशी केली होती. मात्र कंपनीचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले, हा घोटाळा दिपुंज गुप्ता यानेच केल्याचे समजताच त्यांनी वाकोला पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी सहाजणांचे पोलिसांनी जबानी नोंदवून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला काश्मीर येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर सहकार्‍यांचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More