पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक – eNavakal
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला सात वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. खमाक्षसिंग ऊर्फ किशनसिंग खरवट असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत बबरसिंग ऊर्फ बाबू डुंगरसिंग दसाना, डालूसिंग पन्नासिंग राजपूत आणि केशरसिंग गंगासिंग परमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 86 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमृत चुनीलाल जैन हे चेंबूर येथील एन. जी. आचार्य मार्गावरील नॅचरल डेअरीसमोरील पांडुरंग भवन इमारतीच्या रुम क्रमांक एक आणि तीनमध्ये राहतात. त्यांचा त्याच इमारतीच्या तळमजल्यावर जी. सी ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. कामानिमित्त अमृत जैन हे डिसेंबर 2013 रोजी ओरिसा येथे गेले होते. 22 जानेवारी रात्री साडेदहा ते 23 जानेवारी 2013 पहाटे साडेपाच वाजता काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तिजोरीतील दीड किलो वजनाचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने, दहा किलो चांदीचे दागिने आणि शिक्के, वेगवेगळ्या प्रकारचे हिरे आणि 50 हजार रुपयांची रोकड असा 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. ही माहिती सकाळी अमृत जैन यांची आई जीवीबाई जैन यांना समजताच त्यांनी गोवंडी पोलिसांना ही माहिती दिली होती. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास सुरु असतानाच अवघ्या दोन काही तासांत चेंबूर रेल्वे स्थानकातून बबरसिंग याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत त्यानेच त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या अटकेनंतर त्याच्या इतर दोन सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र खमाक्षसिंग खरवट हा गेल्या सात वर्षांपासून वॉण्टेड होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो पालघर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याला पालघर येथून शिताफीने अटक केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, पी.व्ही.सिंधू, मेरी कोम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रेडी मिक्स सिमेंटच्या 12 प्लांटवर कारवाई! ठाणे पालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – ठाण्यातील बेकायदा रेडी मिक्स सिमेंट प्लांटविरोधात ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली असून 18 पैकी 12 प्लांटवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई...
Read More
post-image
News विदेश

कोरोना व्हायरसची जगभरात दहशत! चीनमध्ये 41 जणांचा मृत्यू

दिल्ली – कोरोना व्हायरसची जगभरात दहशत निर्माण झाली आहे. चीनमध्ये सुमारे 41 जणांचा या विषाणूजन्य संसर्गाने मृत्यू झाला आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवणारे निर्दोष

माणगाव- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीच्या मागे असलेला वाघ्याचा पुतळा हटवल्याच्या खटल्यात संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांची माणगाव सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर आणि श्री जोतिबा मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट (इमारत संरचना पाहणी) लवकर केली जाणार आहे. दोन्ही मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट स्ट्रक्टवेल...
Read More