पाली खोपोली मार्गावरील पुलाच्या स्लँब व खाबांला तडे – eNavakal
News अपघात महाराष्ट्र

पाली खोपोली मार्गावरील पुलाच्या स्लँब व खाबांला तडे

अलिबाग – मुबंई पुणे एक्सप्रेस वे व मुबंई गोवा हायवेला जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे खोपोली पाली वाकण रोड. या मार्गाचे रुदींकरण चालु आहे. काही दिवसांपुर्वीच २५ – २६ जुन च्या रात्री या मार्गावरील खुरावले फाटा येथील रस्ताच वाहुन गेला होता. तेव्हा हा मार्ग ४८ तास वाहतुकी करीता बंद होता.  याच मार्गावरील जाभुंळपाडा येथील पालीच्या दिशेचा मुख्य रस्त्यावरील नाल्याच्या पुलाची ची दुरावस्था झालेली आहे. खोपोली दिशेला असलेल्या एका खाबांचा कठड्याचा भाग पडला असुन त्याखालील दगडी खाबांला मोठी भेग पडली आहे व तो खाबं केव्हाही कोसळेल अश्या अवस्थेत सध्या आहे. मधल्या खाबांवरील पुलाच्या स्लँबलाच मोठी चिर जावुन त्याचे दोन भाग झाले आहेत. केव्हाही अवजड गाडी जावुन त्या पुलाचा स्लँब मधोमध चिरला जाईल अशी अवस्था स्लँबची झाली आहे.

तसेच त्या पुलाच्या तीन खाबांवरील दोन्ही स्लँबचे भाग खालुन पडक्या अवस्थेत असुन त्याचे स्टील राँड लटकताहेत त्यामुळे हा पुल या पावा साळ्यात केव्हा ही पडु शकतो कारण या पुलाजवळुन जाणा-या आबां नदीला नेहमीच पाण्याची पातळी वाढुन अनेक वेळा खोपोली – पाली – वाकण हा मार्ग बंद करायला लागतो. या विषयी नागरिकांनीही अनेक वेळा प्रशासनाला ही बाब लक्षात आणुन दिली आहे. परंतु प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असाच प्रश्न उपस्थित मार्गावरील रस्त्यांची व पुलांची अवस्था बिकट असुन केव्हाही दुर्घटना घडु शकते,

महाडच्या सावित्री पुलाच्या दुर्घटने नतंरही प्रशासनाचे महत्वाच्या मार्गावरील पुलांकडे दुर्लक्ष झालेले दिसत असुन विशेषत: कोकोणातील अनेक पुल धोकादायक स्थीतीत असुन त्यांचे लवकरच स्ट्रक्चरल आँडीट करुन योग्य ते पावले उचलण्याच आश्वासन देवुन महाड सावित्री पुल सहा महीन्यात बनविण्यात आला मात्र आता बाधंकाम विभाग, msrdc, केद्रीय रस्ते वाहतुक सह अनेक सस्थां असुन सुद्धा कोकणातील पुलांची या ५-६ दिवसांच्या कोसळधार पावसात झालेली दुरावस्था हे दुर्घटनेला आमंत्रणच आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More