पालिकेच्या कारवाईत रेल्वेचा खोडा बांधकामावरील कारवाई लावली पुढे ढकलायला – eNavakal
News मुंबई

पालिकेच्या कारवाईत रेल्वेचा खोडा बांधकामावरील कारवाई लावली पुढे ढकलायला

मुंबई- रेल्वे लगतच्या बांधकामांची पाहणी करून ती त्वरीत पाडण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेने महापालिकेला दिल्या आहेत. मात्र, रेल्वे लगतच्या बबांधकामांची पाहणी केल्यानंतर ती पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कारवाईतच रेल्वेने अडथळा आणला आहे. बांधकामे जरूर तोडा, परंतु रेल्वेचं जंबोब्लॉक असेल त्याचवेळी असं सांगत महापालिकेला कारवाई पुढे ढकलायला लावली आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील सिमेंट गोडाऊन जवळील बेलासिस रोड येथील रेल्वेच्या संरक्षण भिंतीवर केलेल्या बांधकामांबाबत पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी महापालिकेला पत्र लिहून ती बांधकामे तोडून टाकण्याची सूचना केली होती. यावेळी रेल्वे अधिकारी व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या संयुक्त पाहणीमध्ये ही अनधिकृत बांधकामे आढळून आल्यामुळे 8 ऑगस्ट रोजी कारवाई मोहिम हाती घेतली. परंतु या कारवाईलाच रेल्वेने आक्षेप घेतला.ही कारवाई 8 व 9 ऑगस्ट या दरम्यान हाती घेतली जाणार होती. त्यामुळे या कारवाईदरम्यान रेल्वे रुळांवर रॅबीट पडण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने संरक्षण भिंती शेजारी असलेल्या रेल्वे रुळांवरून जाणार्‍या रेल्वे गाड्यांबाबत योग्य ती खबरदारी घेऊन तोडक कारवाईला सहकार्य करण्याची सूचना महापालिकेने रेल्वेला दिली होती. त्यानुसार पश्चिम रेल्वेने 9 ऑगस्टला महापालिकेला पत्र पाठवून 12 ऑगस्ट रोजी जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे, या दिवशी ही कारवाई करण्याचा सूचना महापालिकेला केल्या आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीआयडीचे निर्माते बिजेंद्र पाल सिंह ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी

पुणे – ‘फिल्म अॅँँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदाचा बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आता या पदावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्यप्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये अशोक गहलोत मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पाच पैकी तीन राज्यात भरघोस यश मिळाले. मात्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? यावरून...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : पराभवामुळे शेतकऱ्यांची आठवण

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पार्टीची झोप उडालेली दिसते. एक दोन नव्हे तर तीनही राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागल्यामुळे हा पराभव त्यांनी बराच मनावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय हॉकी संघ पराभूत

भुवनेश्वर – विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बलाढ्य हॉलंडने अटीतटीच्या सामन्यात भारताचा 2-1...
Read More