पालिका शौचालयांत बसवणार सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन – eNavakal
News

पालिका शौचालयांत बसवणार सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टयांमधील चक्क 235 ठिकाणी सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासाठी पालिका 1 कोटी 71 लाख 72 हजार 629 रुपये खर्च करणार आहे. पालिकेने तसा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.
मुंबईतील दाट झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्येक घरात शौचालय बांधणे शक्य नाही. त्यामळे वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधली जातात. वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मुंबईत विविध ठिकाणी 652 इतकी शौचालये बांधण्यात आलेली आहेत. झोपडट्ट्यांत सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सोय उपलब्ध नसते. अनेकदा वापरलेले नॅपकिन कचर्‍यात टाकले जातात. त्यामुळे रोगराई पसरणे तसेच जंतुसंसर्गाचा धोका होऊ शकतो. सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर मशीनमध्ये जाळून व त्याचे राखेत रुपांतर करणे ही पध्दत उपलब्ध आहे. मात्र सॅनिटरी नॅपकिन्सची सुविधा उपलब्ध नसल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन पालिकेने 235 सार्वजनिक शौचालयांत सॅनिटरी नॅपकिन मशिनची सोय उपलब्ध करण्याचे ठरवले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन

मुंबई – आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जीवनविद्या मिशनतर्फे वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत...
Read More
post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More