पालिका मुख्यालय व सीएसएमटी टर्मिनस परिसराचे पालटणार रुपड – eNavakal
News मुंबई

पालिका मुख्यालय व सीएसएमटी टर्मिनस परिसराचे पालटणार रुपड

मुंबई – मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणारी आपली मुंबई महानगरपालिका ही आपल्या क्षेत्रातील रस्ते सुरक्षा विषयक गुणवत्तापूर्ण व सकारात्मक सुधारणांसाठी सदैव कटिबद्ध आहे. याच कटिबद्धतेचा भाग म्हणून जागतिक वारसास्थळ असणारे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस व पालिका मुख्यालय यांच्या परिसरात असणार्‍या रस्त्यांचे रुपडे लवकरच पालटणार आहे.
या दोन्ही ऐतिहासिक इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पादचार्‍यांची ये-जा असते. यामध्ये पर्यटकांसह, चाकरमान्यांचाही समावेश असतो. या पादचार्‍यांना अधिक सुरक्षितपणे, सुलभतेने व सहजतेने चालता यावे यासाठी या परिसरातील पादचारी मार्गांमध्ये महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल प्रायोगिक स्वरुपात करण्यात येणार आहेत. यामध्ये नाविन्यपूर्ण प्रकारच्या अनेक आकर्षक बदलांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या प्रायोगिक प्रकल्पाचे काम आजपासून सुरु करण्यात येत असून ते केवळ एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. न्यूयॉर्कच्या शहर वाहतूक विभागाच्या माजी आयुक्त व ‘ब्लूमबर्ग असोसिएट्स’ च्या प्राचार्या जेनेट सादिक-खान यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबई शहराला भेट दिली होती. त्यांच्या भेटीदरम्यान या प्रकल्पाची उद्घोषणा करण्यासह या प्रकल्पासाठी पालिकेने ‘ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाईड’स्वीकारले होते. त्याअंतर्गत असणार्‍या मार्गदर्शक तत्वांनुसार व ज्या परिसरात हा प्रकल्प राबवावयाचा आहे, त्या परिसराचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वर्षावर बैठक

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस नव्या रुग्णांची भर पडत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More