पालघर पोलीस अधीक्षकांच्या ‘कॅम्प ऑफिस’चे उदघाटन – eNavakal
महाराष्ट्र

पालघर पोलीस अधीक्षकांच्या ‘कॅम्प ऑफिस’चे उदघाटन

वसई – वसईकर जनतेला त्यांच्या व्यथा व तक्रारी करण्यासाठी थेट पालघर अधीक्षक कार्यालय गाठावे लागते त्यामुळे त्यांचा वेळ,श्रम आणि पैसा अधिक वाया जातो, त्यामुळे यापुढे येथील जनतेचा विचार करून त्यांच्या तक्रारी वसईतच बसून सोडवण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे चांगलेच आक्रमक झाले आहेत,

पालघर पेक्षा वसई सेक्टर मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण जास्त अधीक असून त्याला आळा बसावा आणि घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने जनतेच्या तक्रारींना हि न्याय देण्याच्या मानसिकतेतून पालघर पोलीस अधीक्षक यांनी गुरुवारी आपल्या वसई सेक्टर च्या कॅम्प ऑफिसचे उदघाटन केले, दरम्यान या उदघाटन प्रसंगी त्यांच्या समवेत वसई अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर ,पोलीस उपाधीक्षक विरार जयंत बजबळे, वसई पोलीस उपाधीक्षक विजय तोटेवाड तसेच माणिकपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दामोदर बांदेकर, वालिव पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

एकूणच वसई तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे कामकाजावर व्यवस्थित लक्ष ठेवता यावे,यासाठी आता पोलीस अधीक्षक स्वतः हे प्रत्येक आठवड्यातून दोन ते तीन दिवस कॅम्प ऑफिस वसई येथे वसई सेक्टरचे कामकाज पाहणार असल्याची माहिती एस.पी.पी आर ओ यांनी दिली,
विशेष म्हणजे पालघरच्या प्रवासाचे द्रविडीप्राणायाम वाचले असल्याने व हे कॅम्प ऑफिस सुरु झाल्याने वसईकर जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More