पालघर पोटनिवणूक : आमचाच खासदार निवडून येणार – हितेंद्र ठाकूर – eNavakal
निवडणूक मुंबई राजकीय

पालघर पोटनिवणूक : आमचाच खासदार निवडून येणार – हितेंद्र ठाकूर

बहुजन विकास आघाडीचाच खासदार निवडून येणार, पक्षाचा दावा

ठाणे – पालघर पोटनिवणूकीत बहुजन विकास आघाडीचाच खासदार निवडून येणार असल्याचा दावा पक्षाने केला आहे.  आमच्या पक्षाचे काम केलेला आमचा उमेदवार असेल, आम्हाला उमेदवार आयात- निर्यात करण्याची गरज नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे.  आम्ही, भाजप आणि काँग्रेस इथे आघाडीचे पक्ष आहोत. गेली अनेक वर्षे निवडणूक लढवत आहोत. शिवसेना मात्र मध्येच आल्याचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष  हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.  10 तारखेला बहुजन विकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमचे इथे अस्तित्व आहे. भाजपसोबत सत्तेत असणे हा वेगळा भाग आहे. याचा अर्थ कुणी आम्हाला गृहीत धरू नये. शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन हे मुंबई-ठाण्याहून शिवसैनिक आणून केले. आदिवासी भागात ते पचत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिकांना बोलावले होते. चिंतामण वनगा हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विरोधकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. स्वछ प्रतिमा आणि लोकांशी चांगले संबंध होते. हा झाला वडिलांचा भाग पण मुलाच्या बाबतीत ते घडेल असं नाही. पण वनगा कुटुंबियांच्या नाराजीचा भाजपला फटका बसेल. आयात उमेदवारांना स्थानिक कसे स्वीकारतील? असा सवालही त्यांनी  केला.

बुलेट ट्रेनच्या बाबतीत असलेले समज गैरसमज दूर झाले पाहिजेत. बुलेट ट्रेन लांब पल्याची तसेच बुलेट ट्रेन संपूर्ण देशात असणे गरजेचे आहे. मात्र ही बुलेट ट्रेन ठराविक अंतरापुरती नसावी. प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया बुलेट ट्रेनबाबत  ठाकूर यांनी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धुळ्यात सेनेचे दोन महानगरप्रमुख तुरुंगात; महालेंना दिला डच्चू

धुळे – शिवसेनेतर्फे धुळ्यासाठी दोन महानगरप्रमुख पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुख असलेले सतिश महाले भूसंपादन मोबदला हडपल्याप्रकरणी अमळनेरमध्ये दाखल गुन्ह्यात सध्या जळगाव कारागृहात...
Read More