पालघर जिल्ह्यात २८५ बाल विकास केंद्र सुरु होणार – eNavakal
News महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यात २८५ बाल विकास केंद्र सुरु होणार

पालघर – पालघर जिल्ह्यातील ६ वयोगटापर्यंत तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात २८५ ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. यामध्ये डहाणू तालुका ८५, जव्हार ५५, विक्रमगड ४३, वाडा ३८, मोखाडा २६, पालघर १८, तलासरी ११ व वसई तालुका ९ केंद्रांचा समावेश आहे कुपोषणमुक्तीसाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज पालघर येथे मुख्य सेविका व आशा कार्यकर्तीसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेदरम्यान ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येईल. या बाल विकास केंद्रामार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैदकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे.

ग्राम बाल विकास केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत योजनेअंत र्गत वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या अंतर्गत तीव्र कुपोषित बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, दोन वेळा अंगणवाडीतील आहार,अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्राअंतर्गत दिला जाणारा विशेष आहार तीन वेळा असा एकूण आठ वेळा आहार द्यायचा आहे. अमायलेजयुक्त आहार कसा तयार करा वा, याच्या पद्धतीही याअंतर्गत ठरवून देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांचे डोसही द्यायचे आहेत.

कार्यशाळेस उपस्थित मुख्यसेविकांकडून यावेळी कुपोषण निर्मुलनाची खालील प्रतिज्ञा म्हंणून घेण्यात आली

‘मी एक अंगणवाडी सेविका अशी प्रतिज्ञा करते की, जे ग्राम बालविकास केंद्र अंगणवाडी स्तरावर सुरु झाले आहेत. त्यात सॅम (SAM) आणि मॅम (MAM) प्रती बालकासाठी रु. २१५०इतका निधी प्राप्त झाला आहे. मी सर्वांच्या साक्षीने मासिक मिटिंगमध्ये शपथ घेते की, मला माझ्या बालविकास केंद्रासाठी मिळालेल्या एकूण रकमेचा मी माझ्या अंगणवाडीतील बालकांच्या आहार व औषधांसाठी १०० टक्के विनियोग करून सॅम (SAM) आणि मॅम (MAM) बालके ३० दिवसात प्रामाणिकपणे प्रयत्न करून साधारण श्रेणीत आणेलच व माझी अंगणवाडी कुपोषणमुक्त करेलच, असे मी आपणास आश्वासित करते.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More