पालघरमध्ये शिवसेनेविरोधात नारायण राणेंची तोफ धडाडणार – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

पालघरमध्ये शिवसेनेविरोधात नारायण राणेंची तोफ धडाडणार

मुंबई – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात खासदार नारायण राणे यांना प्रचार करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आगामी प्रचारात खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेविरोधात नारायण राणेंची तोफ धडाडणार आहे. खासदार चिंतामणराव वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना पालघरमध्ये उमेदवारी दिली आहे. तर भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. 28 मे रोजी ही लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पालघर पोटनिवडणुकीच्या आगामी प्रचारात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशा कट्टर हाडवैर्‍यांचा सामना रंगताना दिसणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More