पायल तडवी आत्महत्या प्रकरण! तपास यंत्रणेच्या तपासवर हायकोर्ट नाराज – eNavakal
News मुंबई

पायल तडवी आत्महत्या प्रकरण! तपास यंत्रणेच्या तपासवर हायकोर्ट नाराज

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तपासयंत्रणेच्या तपासावरच हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉ. पायलसोबत होत असलेल्या रॅगिंग संदर्भात तीच्या पतीने आणि आईने केलेल्या तक्रारीची दखल न घेणार्‍या नायरच्या विभाग प्रमुख महिला डॉ. यी चिंग लिंग यांच्या निष्काळजीपणा विरोधात रॅगिंग कायद्यांतर्गत कारवाई करता येऊ शकते, असा सल्लाही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी यावेळी दिला. तसेच या प्रकरणी तक्रार करणार्‍या डॉ. स्नेहा शिंदे आणि अन्य साक्षीदारांचे सीआरपीसी 164 अन्वये जबाब नोदवून घ्या, असे निर्देश देऊन जामीन अपिलाची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवली.
डॉक्टर पायल तडवी हिने नायर रुग्णालयाच्या वस्तीगृहात 22 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघा डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाबरोबरच अ‍ॅट्रोसिटी आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यान्वये आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने या तिघींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सत्र न्यायालयाच्या जामीन फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात आरोपींच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तपास यंत्रणेच्या कामकाजावरच नाराजी व्यक्त करताना जामिनासाठी धाव घेणार्‍या तिघा डॉक्टरांना खडेेबोल सुनावले. हा खुनाचा अथवा अपघाती मृत्यूचा खटला नाही. असे स्पष्ट करताना न्यायालयाने या प्रकरणात आत्महत्या करण्यापूर्वीपासूनच डॉ. पायलवर मानसीक आघात होता. तीने ही बाब आईला सांगितली नसती तर हे प्रकरण उघड झालेच नसते. या प्रकरणासंबंधी तीच्या आईने आणि पतीने केलेल्या तक्रारीची दखल न घेणार्‍या नायरच्या ओबस्टस्ट्रिक्स आणि गायनाकॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. यी चिंग लिंग यांच्या विरोधातही रॅगिंग कायद्यांतर्गत कारवाई करता येऊ शकतेे असा सल्ला तपास यंत्रणेला दिला.

बंदीची याचिका फेटाळली
खटल्याच्या कामकाजावर प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर बंदी घालावी अशी विनंती सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केली. त्याला आरोपीच्यावतीने अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी सहमती दर्शविली. मात्र न्यायालयाने याला नकार दिला. यापूर्वीही सोहराबुद्दीन हत्या प्रकरणातही सत्र न्यायालयाने घातलेली बंदी हायकोर्टाने उठवल्याची आठवण करून देतान बंदी घालण्याची विनंती फेटाळून लावली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

भारताने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक – पंतप्रधान

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताने कोरोनाचं संकट वेळीच ओळखलं...
Read More
post-image
देश राजकीय

तबलिगी जमातवर कारवाई करा, अमरसिंह यांची मागणी

नवी दिल्ली – देशभर लॉकडाऊन असतानाही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून तब्बल 17 राज्यांत कोरोना संसर्ग पसरवणाऱ्या तबलिगी जमातवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्यसभा खासदार...
Read More
post-image
महाराष्ट्र

इंटरनेट रेडिओ सुरू करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका

नवी मुंबई – कोव्हिड – 19 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध माध्यमांचा वापर केला असून आता यामध्ये इंटरनेट रेडिओ या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ‘दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला...
Read More
post-image
देश

‘हल्दीराम भुजियावाला’चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन

नवी दिल्ली – शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले....
Read More