पादचारी पुल दुर्घटनाप्रकरण! हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल – eNavakal
News

पादचारी पुल दुर्घटनाप्रकरण! हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

मुंबई- सीएसएमटी पादचारी पुल दुर्घटनेप्रकरणी अखेर आज आझाद मैदान पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध हलगर्जीपणासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सहाजणांचा मृत्यू झाला तर तीसहून अधिक जखमी झाले आहेत. या गुन्ह्यांचा आझाद मैदान पोलिसांसह गुन्हे शाखेकडून संयुक्त तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. सीएसएमटी रेल्वे स्थानकलगतच हिमालय हाऊस ते टाईम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणार्‍या पादचारी पुलाचा भाग कोसळून गुरुवारी सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्यात अपूर्वा अभय प्रभू, रंजाना उमाजी तांबे, मोहन यल्लप्पा कायंगडे, जाहिद सिराज खान, भक्ती राजेंद्र शिंदे आणि तपेंद्र सिंग ठगे सिंग अशी या सहाजणांची नावे आहेत. या दुर्घटनेत 30 हून अधिक जखमी झाले असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज, जी. टीसह इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी काहींना शुक्रवारी उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. या घटनेची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत संबंधित दोषी व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे एमआरए पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहन कांबळे यांच्या तक्रारीवरुन आझाद मैदान पोलिसांनी संबंधित आरेापीविरुद्ध 304 अ, 337, 338 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More