पाण्याच्या शोधासाठी रस्ते ओलांडताना बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र

पाण्याच्या शोधासाठी रस्ते ओलांडताना बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू

नाशिक – पाण्याच्या शोधासह अन्य कारणामुळे दोन महिन्यात तब्बल 12 बिबटे जिल्ह्यात विविध ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत 2 बिबटे विहिरीत पडून तर रस्ते अपघातात 4 बिबटे ठार झाले आहेत. तसेच नैसर्गिकरित्या मृत्यू होणार्‍या बिबट्यांची संख्याही लक्षणीय आहे.
वन विभागाच्या जानेवारी ते फेब्रुवारी 2019 च्या अहवालानुसार बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 2018 मध्ये राज्यभरात 88 बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यात रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात 24, नैसर्गिकरित्या 57, तर शिकारीत 7 बिबटे मृत्युमुखी पडले. यंदाच्या वर्षीही बिबट्यांचे संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वर्षाच्या प्रारंभी फक्त नाशिक जिल्ह्यातच 12 बिबट्यांचा अंत झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नाशिक परिक्षेत्रातील संगमनेर, अहमदनगर, पूर्व नाशिक आणि मालेगावमध्ये बिबट्यांचा अंत झाला आहे. 12 पैकी 2 बिबट्यांचा अंत आजारपणामुळे झाला असून 4 बिबट्यांचा अंत नैसर्गिकरित्या झाला आहे. पाण्याच्या व सावजाच्या शोधात असताना विहिरीत पडून 2 बिबटे मृत्युमुखी पडले. रस्ते ओलांडताना झालेल्या अपघातात 4 चार बिबटे ठार झालेत. वन विभागाच्या अहवालात अवघ्या दोन महिन्यात 12 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More