पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना विजेच्या धक्क्याने २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू – eNavakal
महाराष्ट्र

पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना विजेच्या धक्क्याने २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई – मुंबईत पाईपलाईनचे काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ५ कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात पाण्याची पाईपलाईन फुटली होती. या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान ही दुर्घटना घडली.

पाईपलाईनच्या कामासाठी आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास कर्मचारी पोहोचले होते. तेव्हा अचानक 7 कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर इतर पाच जण हे यातून थोडक्यात बचावले आहेत. गणेश दत्तू (वय 45), अमोल काळे (40) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत, तर नाना पुकळे (41), महेश जाधव (40), राकेश जाधव (39) अनिल चव्हाण (43), नरेश अधांगळे(40) अशी जखमींची नावे आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरू आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

IPL2020 : आज विजय हवाच! चेन्नई विरुद्ध राजस्थान भिडणार

अबूधाबी – आयपीएलच्या १३व्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी गेल्या सामन्यात पराभव पत्करला होता. त्यामुळे प्ले...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही! मदत मागितली तर बिघडलं कुठं?

सोलापूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राज्यात अतिवृष्टी झाली असताना राज्य सरकारने केंद्राकडे मदत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#DDLJ राज आणि सिमरन आता लंडनमध्ये दिसणार

मुंबई – 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजवर या चित्रपटाने अनेक...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना विजेच्या धक्क्याने २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई – मुंबईत पाईपलाईनचे काम सुरू असताना वीजेचा धक्का लागून पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ५ कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही!

सोलापूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ‘हे सरकार शेतकऱ्यांचं आणि जनतेचं आहे. त्यामुळे सरकार तुम्हाला नाराज करणार...
Read More